Devendra Fadnavis : "मला भेटायला कोणीही आलं तरी तयार"; फडणवीसांचं सूचक विधान

महाराष्ट्रात संवाद सुरु राहिला पाहिजे. आपण संवादहीनता कधीही बघितली नाही.
Devendra Fadnavis informed  Rs 487 crore has been issued for development of Nagpur railway station
Devendra Fadnavis informed Rs 487 crore has been issued for development of Nagpur railway station

मुंबई : आपल्याला भेटायला कोणीही आलं तरी मी तयार आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. महाराष्ट्रात संवाद सुरु राहिला पाहिजे अशी अपक्षेही त्यांनी व्यक्त केली आहे. साम टीव्हीवरील कार्यक्रमात ते बोलत होते. (Devendra Fadnavis says I am Ready to meet anyone who came to me)

Devendra Fadnavis informed  Rs 487 crore has been issued for development of Nagpur railway station
Devendra Fadnavis: "होय! मी बदलाच घेतला"; ठाकरे सरकार पाडण्यावर अखेर फडणवीस स्पष्ट बोलले

संजय राऊत यापूर्वी दररोज टीका करायचे ते आता म्हणतात मी फडणवीसांना भेटणार आहे. तर फडणवीस म्हणतात नकारात्मकता दूर होऊ द्या. पण अचानक विरोधीपक्षातल्या कोणावर केसेस रजिस्टर होतात, याची सांगड कशी घालायची? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, विरोधी पक्षातील कोणावरही चुकीच्या केसेस टाकलेल्या नाहीत. ज्या तक्रारी येतात त्या रजिस्टर कराव्या लागतात, त्याप्रमाणे त्या झाल्या. कोणावरही सकाळी अर्ध्यारात्री घरातून उचलून नेण्याचं काम केलेलं नाही. जुन्या केसेस उकरुन काढत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही"

हे ही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

आव्हाडांनी बागुलबुवा कसा करायचा याची ट्युशन घ्यावी

जर आपल्याला कॅमेऱ्यात दिसतंय की आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते थिएटरमध्ये जाऊन दंगामस्ती करत आहेत, लोकांना धमकावत आहेत. त्यांच्यावर जर असा गुन्हा दाखल झाला नाही तर राज्यकर्ते म्हणून आम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही. त्यामुळं मी पोलिसांचं अभिनंदन करतो की आम्ही कुठल्याही सूचना दिलेल्या नसताना त्यांनी स्वतःहून कारवाई केली आहे. जितेंद्र आव्हाडांना एखाद्या गोष्टीचा बागुलबुवा कसा करायचा हे त्यांना चांगलं समजत. याचं त्यांनी ट्युशनच घ्यायला हवी. योग्य पद्धतीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते कोर्टात गेले कोर्टानं त्यांना जामीन दिला.

मला कोणीही भेटायला आला तरी त्याची भेट घेईन - फडणवीस

महाराष्ट्रात संवाद सुरु राहिला पाहिजे, महाराष्ट्रात आपण संवादहीनता कधीही बघितली नाही. संवादहीनता संवेदनहीनतेकडे जाते. त्यामुळं राजकीयदृष्ट्या आपण एकमेकांवर कितीही टीका केली तरी आपण एकमेकांसमोर बसू शकत नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रात येऊ नये म्हणून मला भेटायला कोणीही आलं तरी मी त्याची भेट घेईन, असं यावेळी फडणवीस म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com