
Mumbai: महाराष्ट्रातील अभूतपूर्व विजयाचे नायक देवेंद्र फडणवीस असून त्यांच्याच हाती महाराष्ट्राची सूत्रे सोपविण्याचा निर्णय भाजपमध्ये जवळपास निश्चित झाला आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीत याबद्दलची चर्चा झाली .
या विजयाच्या भव्यतेला साजेशा समारंभात शपथविधी सोहळा करण्याचे ठरत असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विजय मिळाला हे भाजपला पूर्णत: समजत असून त्यांच्याही या कर्तृत्वाचा मान राखला जाईल, असे या नेत्याने सांगितले.