Latest Thane News: लोकसभा निवडणुकीत दोन लाखाहून अधिक मतांचे दान पदरात पडल्यानंतर वाढलेला आत्मविश्वासाच्या जोरावर, जिजाऊ संघटनेकडून ठाणे, पालघर आणि कोकणात १८ ठिकाणी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे.
त्यानुसार ठाणे शहर, मुंब्रा कळवा, शहापूर आणि कल्याण पश्चिम मध्ये उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे दिसून येत आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बल्ले किला असलेल्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघासह ओवळा - माजिवडा मतदार संघात अद्याप तरी उमेदवार दिला नसल्याने जिजाऊ संघटनेचे शिवसेना शिंदे गटाला समर्थन तर नाही ना अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.