esakal | आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नाही ; `या` नेत्याने पुन्हा केली टिका 
sakal

बोलून बातमी शोधा

devendra fadanvis

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलेल्या अपयशाचे खापर आयुक्तांवर फोडण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. विशेष म्हणजे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना विश्‍वासात न घेता आयुक्तांची बदली करण्यात आली होती. अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली

आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नाही ; `या` नेत्याने पुन्हा केली टिका 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई  : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलेल्या अपयशाचे खापर आयुक्तांवर फोडण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. विशेष म्हणजे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना विश्‍वासात न घेता आयुक्तांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याची बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोरोनाच्या धर्तीवर फडणवीस यांनी आज नवी मुंबई शहराला भेट दिली. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला.

महत्त्वाची बातमी ः   राजेश टोपेंनी दिली गोड बातमी, आता कोरोना रुग्णांना आपल्या नातेवाईकांना 'असं' भेटता येणार
 

सरकारला टोला लगावताना फडणवीस म्हणाले की, कोरोनाच्या लढाईत आयुक्त पदावरील व्यक्तींची भूमिका महत्त्वाची असते. अशा वेळेस त्या पदावरील व्यक्तीची सतत बदली होत राहिल्यास लढाईतील वेग मंदावतो. ही बाब सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वच आयुक्तांच्या बदल्या करताना पालकमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना विश्‍वासात घ्यायला हवे होते. जेव्हा देशात अनलॉक सुरू असताना लॉकडाऊनचा निर्णय घेतला जातो. तेव्हा आपण यातून कधी बाहेर पडू याचा सरकारने विचार करायला हवा. सद्यपरिस्थिती पाहता सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे. किमान आपण एकत्र आहोत असे तरी दाखवायला पाहिजे, पण तसेही दाखवता येत नसल्याचे फडणवीस म्हणाले. 

मोठी बातमी ः कोरोनाचा वाढता संसर्ग; ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ आता 'या' तालुक्यातही संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा...


पनवेलमध्ये पाहणी केल्यावर फडणवीस यांनी वाशी येथे महापालिकेतर्फे सिडको प्रदर्शन केंद्रात उभारण्यात आलेल्या कोव्हिड केंद्राला भेट देऊन पाहणी केली. नंतर महापालिका मुख्यालयात येऊन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेऊन कोरोनाबाबत महापालिकेतर्फे राबवल्या जात असणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यादरम्यान पार पडलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी खाजगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनधन आरोग्य योजना कठोरपणे लागू करण्याची मागणी केली. कोरोनाबाधितांची संख्या पाहता चाचणीचे प्रमाण वाढवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. नवी मुंबईच्या लांबलेल्या प्रयोगशाळेच्या बाबतीतही फडणवीस यांनी टीका करत प्रयोगशाळांना परवानगी देणारी संस्था राज्यात असतानाही प्रयोगशाळा सुरू करण्यास एवढा वेळ का होत आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला. 

devendra fadnavis navi mumbai panvel corona situation visit