डीजी ठाणे बेस्ट डिजिटल इनिशिएटिव्ह अवॉर्डचे मानकरी; ई-समिट गव्हर्नमेंट ग्लोबल स्मार्ट सिटीज फोरमच्या वतीने गौरव

राजेश मोरे
Sunday, 29 November 2020

गव्हर्नमेंट ग्लोबल स्मार्ट सिटीज फोरम 2020 च्या अंतर्गत डीजी ठाणे हे या वर्षीच्या इकॉनॉमिक टाइम्सचे बेस्ट डिजिटल इनशिएटिव्ह अवॉर्डचे मानकरी ठरले आहे.

ठाणे : गव्हर्नमेंट ग्लोबल स्मार्ट सिटीज फोरम 2020 च्या अंतर्गत डीजी ठाणे हे या वर्षीच्या इकॉनॉमिक टाइम्सचे बेस्ट डिजिटल इनशिएटिव्ह अवॉर्डचे मानकरी ठरले आहे. ई-समिट गव्हर्नमेंट ग्लोबल स्मार्ट सिटीज फोरम यांच्या वतीने प्रथमच भारतातील स्मार्ट सिटीजसाठी या ई-अवॉर्डसचे आयोजन करण्यात आले होते. ईटीगर्व्हमेंट डॉट कॉमच्या इकॉनॉमिक टाइम्समधील तंत्रज्ञान विभागातील डीजी ठाणे हे मानकरी ठरले आहे. 

ठाणे जिल्हा परिषदेच्या सीईओपदी डॉ. दांगडे; शुक्रवारी पदभार स्विकारला

भविष्यात इतर स्मार्ट सिटीजसाठी नियोजन, अंमलबजावणी आणि धोरण बनविण्यासाठी नावीन्यपूर्ण काही उपाययोजना करण्याच्या उद्देशाने इ समिट-गव्हर्नमेंट ग्लोबल स्मार्ट सिटीज फोरम यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामुळे स्मार्ट सिटीला मान्यता मिळावी व महापालिकेला एक नवी ओळखी मिळावी, हाही यामागचा एक उद्देश होता. ठाणे महापालिकेला त्यांच्या चार स्टार प्रकल्पांसाठी नामांकित केले होते. इकॉनॉमिक टाइम्सच्या गव्हर्नमेंट ग्लोबल स्मार्ट सिटीज फोरम 2020 चे मानकरी डीजीठाणे ठरले. त्यांनी हा स्मार्ट सिटी पुरस्काराचा मान पटकावला. डीजी ठाणे हा एक डीजी सीटी प्लॅटफॉर्म आहे.

ठाण्यातील रस्त्याचे रुंदीकरण कोणाच्या फायद्यासाठी? भाजप नगरसेवकांचा सवाल

ज्याची ठाणे महापालिका यशस्वीरीत्या अंमलबजावणी करताना दिसत आहे. तसेच हे सर्वात संवादी पोर्टल असल्याने यामार्फत माहिती प्रसारित केली जाते. हे एक उत्तम मोबाईल ऍप्लिकेशन असून, महापालिका आणि नागरिक आणि तसेच व्यापारी यांच्यात दुवा साधण्याचे कार्य या ऍप्लिकेशन मार्फत होताना दिसत आहे. डीजी ठाणे हा एक संवादी डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. जो ठाणे महापालिकेसाठी 2017 मध्ये सुरू करण्यात आला. याची ओळख पॅन इंडियाच्या सर्व स्मार्ट सिटीजमध्ये होत आहे. अवॉर्ड जाहीर होताच ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे गणेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त सहायक आयुक्त 1 यांनी ईटीगर्व्हमेंट डॉट कॉमला अभिवादन करत अभिमानाने या पुरस्काराचा स्वीकार केला. 

 

सध्याच्या कोव्हिड काळात डीजी ठाणेने ठाणे महापालिकेसाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत वेळोवेळी ठाण्यातील नागरिकांपर्यंत सरकारी नियमावली पोहचवण्याचे काम केले. त्याव्यतिरिक्त या प्लॅटफॉर्मने नागरिकांच्या सोयीनुसार ऑनलाईन कर भरणासारख्या काही तरतुदी महापालिकेसाठी केल्या आहेत. 
- गणेश देशमुख,
मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी लि., ठाणे 

---------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DG Thane Best Digital Initiative Award winner Honors on behalf of the e-Summit Government Global Smart Cities Forum