Maharashtra DGP | राज्यातील पोलिसांना स्पष्ट निर्देश, गृहमंत्र्यांना भेटताच DGP ची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरेंवर आजच कारवाई, गृहमंत्र्यांना भेटताच DGP 'अॅक्शन मोड'मध्ये

राज ठाकरेंवर आजच कारवाई, गृहमंत्र्यांना भेटताच DGP 'अॅक्शन मोड'मध्ये

मिशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरणात आता पोलिसांनी तत्काळ कठोर भूमिका घेणार असल्याचं राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी स्पष्ट केलं आहे. मनसेने सार्वजनिकपणे हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं सांगितलं. (DGP Rajnish Seth holds press conference)

राज ठाकरेंने आज शेवटचा दिवस असल्याचं म्हणत मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज शिवतीर्थावर बैठक बोलावली. याआधीच मनसेच्या कार्यकर्त्यांना १४९नुसार नोटीसा देण्यात आल्या आहेत. यानंतर राज्यात घडामोडींना वेग आला असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. याआधी त्यांनी पोलीस महासंचालकांसोबत बैठक घेतली. (Home MInister DIlip Walse Patil Holds meeting with CM Uddhav Thackeray over Law and Order)

हेही वाचा: राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट, वळसे पाटलांची तत्काळ बैठक

दरम्यान, आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तत्काळ पोलीस महासंचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर महासंचालक सेठ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं डीजीपींनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमधील भाषणाचा स्थानिक पोलीस आयुक्तांनी अभ्यास केला असून या प्रकरणात काही सापडल्यास आजच कारवाई करणार असल्याचं पोलीस महासंचालकांनी स्पष्ट केलं आहे. औरंगाबादच्या भाषणात भडकाऊ वक्तव्य केल्याने कार्यकर्ते आणि अन्य नेत्यांवर कारवाई होणार असल्याचं समोर येत आहे. औरंगाबादमधील मनसे नेत्यांच्या घरी पोलीस पोहोचले आहेत. राज ठाकरे यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्यावर करवाई होण्याची शक्यता वाढली आहे.

हेही वाचा: राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट, वळसे पाटलांची तत्काळ बैठक

चोख पोलीस बंदोबस्त आणि थेट गृहमंत्र्यांचे आदेश

 • ८७ एसआरपीएफच्या कंपनी तैनात करण्यात आल्या आहेत.

 • राज्यात ३० हजाराहून अधिक होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

 • जनतेने पोलिसांना सहकार्य करावं

 • एसआरपीएफ आणि होम गार्ड सगळीकडे तैनात

 • कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायद्याचा बडगा

 • सर्व यंत्रणांना कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आदेश

 • गृह मंत्री दिलीप वळसे आणि डीजी समवेत मिटींगमध्ये निर्णय

 • राज्यात कायदा सुव्यवस्था शांत राहावी यासाठी कठोर पावले उचला - गृहमंत्र्यांचे आदेश

 • पोलीस यंत्रणा कठोर पावले उचलावी, कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना ताब्यात घेणार

 • खबरदारी म्हणून नोटीस दिल्या

 • राज्यातील संवेदनशील भागात अलर्ट

राज्यातील १५ हजारांहून अधिक समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सीआरपीसी कलम १०७, ११०, १५१, १५१(३), महाराष्ट्र पोलिस कायदा ५५, ५६ नुसार कारवाई

१३,०५४ जणांना १४९ ची नोटीस बजावण्यात आली आहे.

Web Title: Dgp Rajnish Seth Gives Clear Instructions To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj ThackerayDGP
go to top