
फडणवीस गेमचेंजर! 'मविआ'ची दहा मतं फुटली
महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुका पार पडल्या. भाजप आणि सत्ताधारी यांनी केलेल्या मागण्यांमुळे ऐनवेळी मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. मध्यरात्री निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर मतमोजणी सुरू झाली. यामध्ये पहिला फटका शिवसेनेला बसला. सेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवण्यात आलं. मात्र, ऐनवेळी यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड आणि रवी राणांचं मत ग्राह्य धरण्यात आलं. त्यामुळे मविआचे संजय पवार विजयी होतील, अशी अपेक्षा सत्ताधाऱ्यांना वाटत होती. एकूण 284 मतांवर दिल्लीचा रस्ता ठरणार होता.
मात्र, संपूर्ण निकाल लागल्यानंतर मविआची 10 मतं फुटल्याचं स्पष्ट झालं. आणि धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे हे पहिल्या फेरीतच विजयी झाले. पहिल्या पसंतीची संजय पवार यांना ३३ आणि धनंजय महाडिक यांना २७ मते मिळाली. त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये हा निर्णय गेला. इथेच माशी शिंकली! आणि यानंतर निकालाचं समीकऱण फिरलं.
हेही वाचा: फडणवीसांच्या डोक्यात संख्याबळाचं गणित असल्याशिवाय..; विजयानंतर महाडिकांची प्रतिक्रिया
सेनेला फटका आणि फडणवीस गेमचेंजर
पहिल्या फेरीत भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना 48-48 मतं मिळाली. याचा थेट फायदा धनंजय महाडिकांना झाला. देवेंद्र फडणवीस यांचं प्लॅनिंग कामी आलं. त्यामुळे भाजपने राज्यसभेसाठी दिलेल्या उमेदवाराचा विजय झाला.
जवळपास 6 तासांच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर अखेरीस आक्षेप घेण्यात आलेल्या ५ मतांपैकी केवळ शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आलं. घडी न घालता मतपत्रिका बाहेर आणणे, आपल्या पक्ष प्रतोदासह मतपत्रिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदाला दाखवणे हे भाजपचे आक्षेप निवडणूक आयोगाने मान्य केले. त्यामुळे सेनेला पहिला फटका बसला.
Web Title: Dhananjay Mahadik Won Rajyasabha Election 2022 Devendra Fadnavis
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..