रेणू शर्मावर तात्काळ कारवाई करा, भाजप महिला नेत्याची पोलिसांकडे मागणी

पूजा विचारे
Friday, 22 January 2021

तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत रेणू शर्मावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

मुंबईः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या पीडित महिलेनं तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. बलात्कार प्रकरणी राजकारण होत असल्याने आणि घरगुती कारणामुळे, ही तक्रार मागे घेताना सांगितलं आहे. रेणू शर्मानं तसं पोलिसांना लेखीही लिहून दिलं आहे.  त्यामुळे तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत रेणू शर्मावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

रेणू शर्माने आपली तक्रार लेखी प्रतिज्ञापत्र देऊन मागे घेतली. यावर चित्रा वाघ यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. म्हणूनच चित्रा वाघ यांनी खोटी तक्रार दिल्या प्रकरणी रेणू शर्मावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप करायचे हा धक्कादायक प्रकार आहे. अशा पद्धतीने जर कुणी खोटे आरोप करत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. बलात्कारासारखा गंभीर आरोप धनंजय मुंडेंवर करत आता तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी IPC192 नुसार तात्काळ कारवाई पोलिसांनी करावी. यामुळे ज्या खऱ्या पिडीता आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो. म्हणून खोटे आरोप करणाऱ्यांना शिक्षा व्हायलाचं हवी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. बलात्कार प्रकरणी राजकारण होत असल्याने आणि घरगुती कारणामुळे, ही तक्रार मागे घेताना सांगितलं आहे. रेणू शर्मानं तसं पोलिसांना लेखीही लिहून दिलं आहे.  त्यामुळे तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

स्वत:  धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा खुलास केला होता. धनंजय मुंडे यांनी रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचं देखील सांगितलं. पहिल्या पत्नीपासूनची तीन मुले आणि करुणापासून झालेली दोन मुले अशी पाच मुले असल्याचं मुंडे यांनी स्वत:च कबूल केलं होतं.

हेही वाचा- धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्माने उचललं मोठं पाऊल

दरम्यान रेणू शर्माने धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप करत दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

dhananjay munde case Take Action against Renu Sharma demands Chitra Wagh


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhananjay munde case Take Action against Renu Sharma demands Chitra Wagh