
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सरकारी बंगला वाद चर्चेत आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंडे यांनी मुंबईतील सातपुडा सरकारी बंगला बेकायदेशीररित्या वापरल्याचा आरोप करत दमानिया यांनी सरकारला लीगल नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, त्यांनी 48 तासांत बंगला खाली करण्याची आणि 46 लाख रुपये थकबाकी दंड वसूल करण्याची मागणी केली आहे.