रेणू शर्मांनी तक्रार मागे घेताच वकील रमेश त्रिपाठींचा केसला रामराम

पूजा विचारे
Friday, 22 January 2021

रेणू शर्मानं तक्रार मागे घेतल्यावर वकील अ‌ॅड. रमेश त्रिपाठी यांनी रेणू यांची केस सोडून दिली आहे. 

मुंबईः  पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. बलात्कार प्रकरणी राजकारण होत असल्याने आणि घरगुती कारणामुळे, ही तक्रार मागे घेताना सांगितलं आहे. रेणू शर्मानं तसं पोलिसांना लेखीही लिहून दिलं आहे. रेणू शर्मानं तक्रार मागे घेतल्यावर वकील अ‌ॅड. रमेश त्रिपाठी यांनी रेणू यांची केस सोडून दिली आहे. 

योग्य प्रतिसाद न मिळाल्याने दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २० तारखेला धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी आपलं वकीलपत्र मागे घेतलं होतं. त्यामुळे आपलं या केसशी आता काही संबंध नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.  परवा वकिलांनी वकीलपत्र मागे घेतलं तर काल रेणू शर्मा यांनी देखील आपली केस मागे घेण्यासंदर्भात अर्ज दाखल केला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचा कौटुंबिक वाद आहे. या प्रकाराला राजकीय वळण मिळाल्यामुळे मी ही तक्रार मागे घेतली असल्याचं रेणू शर्मा यांनी सांगितलं. शर्मा यांनी तक्रार मागे घेताच, ही केस लढवणारे त्यांचे वकील अ‌ॅड. रमेश त्रिपाठी यांनी शर्मा यांची केस सोडली.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यानंतर वकील रमेश त्रिपाठी यांनी रेणू शर्मा यांची बाजू उचलून धरली होती. त्यांनी पत्रकार परिषद घेऊनही रेणूची बाजू मांडली होती. तसंच  रेणू यांची केस घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून धमकीचे फोन येत असल्याचंही त्रिपाठी यांनी म्हटलं होतं. दरम्यान आता रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यानं रमेश त्रिपाठी यांनीही केस सोडून दिली. 

हेही वाचा- रेणू शर्मावर तात्काळ कारवाई करा, भाजप महिला नेत्याची पोलिसांकडे मागणी

Dhananjay Munde Renu Sharma Lawyer Ramesh Tripathi leave case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde Renu Sharma Lawyer Ramesh Tripathi leave case