महिला एक, चार वेगवेगळी नावं; गुन्हे शाखेने घरात झडती घेल्यावर हाती लागलं घबाड

सुमित बागुल
Saturday, 9 January 2021

या आधी देखील अनेकदा नाझमाला दुबईतील अबू धाबी विमानतळावरून हद्दपार करण्यात आलं होतं

मुंबई : मुंबईतील धारावीमधील एका महिलेने वेगवेगळ्या नावांचा वापर करून एकूण चार वेगवेगळे पासपोर्ट बनवून स्थानिकांच्या मदतीने दुबईला जाण्याचा प्रयत्न केलाय. दुबईच्या इमिग्रेशन रेकॉर्डमध्ये डिफॉल्टर म्हणून नाव आढळून आल्याने सदर महिला पकडली गेली आहे. नझमा बदरे आलम असं या महिलेचे नाव आहे. 

नझमा बदरे आलम या महिलेविरोधात सहा जानेवारी रोजी दुबई विमातळावरून हद्दपारीची कारवाई करत पुन्हा भारतात पाठवण्यात आलं आहे. यानंतर मुंबईतील सहार पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली आहे. या प्रकरणी नझमा बदरे आलम हीची कस्टडी गुन्हे शाखेकडे सुपूर्द केली गेली आहे. धारावी येथील तिच्या राहत्या घरात शोध घेतल्यानंतर पोलिसांना वेगवेगळ्या नावानी बनवलेले तीन पासपोर्ट मिळालेत. पोलिसांनी हे पासपोर्ट देखील जप्त केले आहेत. 

महत्त्वाची बातमी : पत्नी आणि दोन मुलांना मागे ठेऊन कैलास यांनी स्टेशन ऑफिसमध्येच स्वतःला संपवलं, मन स्तब्द करणारी घटना

साधारण दशकभरापूर्वी नझमाच्या पतीचे निधन झाले आहे. नझमाला दोन मोठ्या मुली देखील आहेत. २००२ साली पहिल्यांदा नझमा आलम दुबईला गेली होती. तेंव्हा तिच्या पासपोर्टवर नाझमाबाई शेख असं नाव होतं. 

या आधी देखील अनेकदा नाझमाला दुबईतील अबू धाबी विमानतळावरून हद्दपार करण्यात आलं होतं. सर्वात आधी 2004 मध्ये युनायटेड अरब अमिरातीमधील कामगार कायदे मोडल्या प्रकरणी हद्दपारीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर तिचे नाव काळ्या यादीत टाकलं गेलं होतं. यानंतर पुन्हा 2016 मध्ये देखील तिच्यावर अशाच प्रकारची कारवाई झालेली होती.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

dharavi based woman deported from dubai airport now detained by mumbai police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dharavi based woman deported from dubai airport now detained by mumbai police