
Mumbai: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावीत सुरू असलेले झोपडपट्टी सर्वेक्षण कासवगतीने सुरू असल्याचे समोर आले आहे. दहा महिन्यांपासून हे सर्वेक्षण सुरू झाले आहे. आतापर्यंत ७० हजार झोपड्यांचे नंबरिंग झाले आहे. तर ३६ हजार झोपड्यांचा डोअर टू डोअर सर्व्हे झाला आहे. त्यामुळे संपूर्ण धारावीचे नंबरिंग आणि सर्वेक्षण पूर्ण व्हायला आणखी किती दिवस लागणार, हा प्रश्न आहे.
राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) आणि नवभारत मेगा डेव्हलपर्स लिमिटेडच्या माध्यमातून धारावीचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यासाठी १८ मार्च २०२४पासून सर्वेक्षण सुरू आहे. त्यानुसार प्रथम झोपडीला युनिक आयडी नंबर दिला जात आहे. त्यानंतर स्वतंत्र टीमच्या माध्यमातून झोपडीधारकांची माहिती घेतली जात आहे.