

Dharavi Redevelopment
ESakal
मुंबई : आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत कायापालट केला जाणार आहे. त्यानुसार आज माटुंगा येथील रेल्वेच्या २२ एकर जागेवर तब्बल १०,४३२ पुनर्वसन घरे आणि १,३७९ व्यावसायिक, औद्योगिक गाळे असलेल्या १० इमारती उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. सेक्टर एक आणि सहामधील पात्र रहिवाशांना माटुंगा येथील घरे प्रथम मिळणार असून, त्यानंतर सुमारे ४,५०० सदनिका धारावीतील इतर पात्र रहिवाशांना प्राधान्यक्रमानुसार दिल्या जाणार आहेत.