
मुंबई, ता. २७ : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले घसघशीत यश आणि विधानसभा निकालाच्या धाकधुकीमुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम काहीसे संथगतीने सुरू होते.
मात्र २३ तारखेला लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुती सरकारला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या दारुण पराभवामुळे विरोधक काहीसे बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे धारावी प्रकल्पाचा वेग वाढणार असल्याचे चित्र आहे. धारावीकरांच्या भूमिकेवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.