
धारावी : भाऊ-बहिणीचे नाते जगावेगळे असते. विश्वास, प्रेम, आपुलकी आदी सर्व गोष्टी या नात्यात असतात. बहीण मोठी असेल, तर ती आईची जागा भरून काढते. जर भाऊ मोठा असेल, तर त्याला वडिलांची जागा घ्यावी लागते. या नात्याला अधिक दृढ करणारा रक्षाबंधन हा सण महिन्यावर आल्याने बहिणींची लगबग सुरू झाली आहे. धारावी परिसरात रंगबेरंगी, आकर्षक राख्या विक्रीसाठी दुकानांमध्ये दाखल झाल्या आहेत.