esakal | चांगली बातमी : दोन दिवसात तब्बल दहा हजार धारावीकरांना मिळणार मोफत लस!
sakal

बोलून बातमी शोधा

Dharavi in Mumbai

चांगली बातमी : दोन दिवसात तब्बल दहा हजार धारावीकरांना मिळणार मोफत लस!

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : धारावीतील (Dharavi) नागरिकांसाठी मोफत कोरोना लसीकरण मोहिम (Corona Vaccination) सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत (Vaccination Drive) दोन दिवसांत सुमारे दहा हजार धारावीकरांना मोफत कोरोना लस (free Corona vaccine) दिली जाणार आहे. या मोहिमेचा आजपासून शुभारंभ (Inauguration) करण्यात आला आहे. ( Dharavi ten thousand people gets corona vaccine free in vaccination drive)

कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, राज्य सरकार, मुंबई मनपा, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि स्थानिक जनता यांच्या एकत्रित प्रयत्नांनी धारावीने यशस्वीरित्या कोरोनावर मात केली. त्यानंतर प्लाझा दानातही धारावीकरांनी पुढाकार घेतला होता. आता कोरोना लसीकरणाबाबतीतही आघाडी घेण्याच्या उद्देशाने धारवीकरांसाठी या मेगा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: शाळकरी मुलीबरोबर अश्लील वर्तणूक करणाऱ्या बसवाहकाला एक वर्षांचा कारावास

धारविकरांनी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या परिस्थितीवर यशस्वीपणे मात केली. मात्र त्यानंतर सुरू झालेल्या लसीकरणाला मात्र धारविकारांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे जनजागृतीसाठी वेगवेगळ्या सामाजिक संघटना पुढे येत आहेत. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने धारावीमध्ये मोफत कोरोना लसीकरण केले जात आहे. मात्र, दाट लोकसंख्येच्या धारावीतील लसीकरण प्रक्रियेला आणखी गती मिळावी आणि सरकारी यंत्रणांवरील भार काही प्रमाणात कमी व्हावा, या हेतूने ही मोहीम सुरू करण्यात आली असून येत्या काळात अशाच रीतीने मोठ्या प्रमाणात धारवीकरांचे लसीकरण करण्याचा आमचा मानस असल्याचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.

loading image