esakal | शाळकरी मुलीबरोबर अश्लील वर्तणूक, कंडक्टरला एक वर्षांचा कारावास
sakal

बोलून बातमी शोधा

Court

शाळकरी मुलीबरोबर अश्लील वर्तणूक, कंडक्टरला एक वर्षांचा कारावास

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : शाळकरी मुलीबरोबर (School Girl) अश्लील संभाषण (Abuse Talking) केल्याच्या आरोपात विशेष पोक्सो न्यायालयाने (Pocso Court) आरोपी बसवाहकाला एक वर्ष कारावासाची सजा नुकतीच सुनावली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तीन वर्षापूर्वी याबाबत पोलीस ठाण्यात (Police Station) फौजदारी फिर्याद (FIR) दाखल केली होती. आरोपी चंद्रकांत कोळीवर पोक्सो कायद्याच्या (Pocso Act) कलम 12 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. या खटल्यात मुलीने दिलेली साक्ष (Witness) महत्वपूर्ण ठरली आहे. ( One year prison by pocso Act to bus Driver for abusing a school girl)

तेरा वर्षीय मुलगी शाळेत जाण्यासाठी बसने प्रवास करायची. जुलै 2018 मध्ये ती प्रवास करत असताना आरोपीने तीला तिकीट दिले आणि तिच्याबरोबर आक्षेपार्ह संभाषण करत बसला. यावर मुलीने त्याला खडसावले. यावेळी बसमध्ये एक-दोन व्यक्ती होत्या. मात्र मुलीच्या ओरडण्याचा कोणताही परिणाम आरोपीवर झाला नाही आणि तो पुन्हा तिच्याकडे येऊन बडबड करत राहिला. त्यामुळे मुलगी बसमधून उतरून निघून गेली. ही घटना तिने मैत्रिणीला सांगितली आणि बसने जाणे बंद केले. काही दिवसांनी तिच्या आईला तिला बसने जाण्याबद्दल विचारले. त्यावेळी तिने काही सांगितले नाही. मात्र तिच्या मैत्रिणीने आईला सर्व सांगितले. त्यानंतर आई मुलीला घेऊन बसडेपोमध्ये गेली.

हेही वाचा: कोविड प्रोजेक्टवर काम करणाऱ्या IIT-B च्या प्राध्यापिकेचं कोविडमुळेच निधन

तिथे मुलीने आरोपीला ओळखले आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष न्यायालयाने आरोपीला विनयभंग आणि अन्य आरोपात दोषी ठरविले. तसेच त्याला पंधरा हजार रुपये दंड सुनावला असून ही रक्कम पीडित मुलीला देण्याचे निर्देश दिले आहेत. शिक्षा सुनावल्यावर अपिल करण्यासाठी शिक्षा स्थगित करावी, अशी मागणी आरोपीच्या वतीने करण्यात आली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली असून एक महिन्यासाठी शिक्षेला स्थगिती दिली आहे.

loading image