शेतकऱ्यांना फायदा फक्त मोदी सरकारच्या काळातच झाला का? संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र

तुषार सोनवणे
Friday, 25 December 2020

शेतकऱ्यांना मोदी सरकारमुळे मोठा फायदा झाला आहे. असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांंनी आपल्या भाषणात म्हटले. त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई - देशभरात सुधारित कृषी कायद्यांच्या विरोधात प्रदर्शन आणि आंदोलने सुरू आहेत. यावर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आज प्रसारमाध्यमांतून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना मोदी सरकारमुळे मोठा फायदा झाला आहे. असं अमित शहा यांंनी आपल्या भाषणात म्हटले. त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

गेल्या पाच वर्षातच शेतकऱ्यांचा फायदा झाला असं नाही. त्याआधी शरद पवार कृषीमंत्री होते. राजनाथसिंह होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. गुजरातचे मोरारजी देसाई पंतप्रधान होते. लालबाहाद्दुर शास्त्री होते. हा देश कृषी प्रधान देश आहे. गेल्या 70 वर्षापासून जगभरात आपण कृषीप्रधान असल्याचा डंका पिटत आहोत. त्याचं श्रेय नक्की मग कोणाला द्यायचं?  असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

या देशाचा विकास आणि शेतकऱ्यांसंबधीच्या घेतलेल्या भूमिका आतापर्यंत राष्ट्रहिताच्याच राहिल्या आहेत. प्रत्येक सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्याच भूमिका घेतल्या आहेत. आज मी पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकत असताना शेतकऱ्यांना मदत होईल अशा काही घोषणा केल्या आहेत. त्याचे मी स्वागत करतो.  या देशातील शेतकऱ्याला प्रत्येक सरकारने आधार देण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचं काम तरी कोणत्याही सरकारने केलेले मला आढळत नाही. हे भारतीय जनता पक्षाने केले आहे. अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात; हाताला किरकोळ दुखापत

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुधारित कृषी कायद्यांवर भाष्य केल्याने, संजय राऊत यांनी त्यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, ' राजनाथ सिंह यांनी देशाच्या संरक्षण विषयांवर फक्त बोलावे. चीनने लद्दाखची सीमा ओलांडली आहे. त्याकडे आधी लक्ष द्यावं.'

Did the farmers benefit only during the Modi government? Sanjay Raut criticism BJP

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Did the farmers benefit only during the Modi government? Sanjay Raut criticism BJP