विदेशीचे वांदे...तळीरामांचा स्वदेशीकडे मोर्चा!

नरेश जाधव
मंगळवार, 14 एप्रिल 2020

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने बंद झाली. यामध्ये पान टपरी, बिअर बार, वाईन शॉप, रेस्टॉरंट आदी दुकानेही बंदच असल्याने तळीरामांची मोठी पंचाईत झाली आहे. काहीजण खिशाला अधिकचा भार देऊन जोखीम पत्करत 'बाटली'ची सोय करीत आहेत. मात्र, लॉकडाऊनचा वाढलेला कालावधी पाहून तेही परवडण्यासारखे नसल्याने तळीरामांनी स्वदेशी अर्थात मोहाच्या दारुकडे मोर्चा वळवल्याचे चित्र दिसत आहे. 

खर्डी (शहापूर) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने बंद झाली. यामध्ये पान टपरी, बिअर बार, वाईन शॉप, रेस्टॉरंट आदी दुकानेही बंदच असल्याने तळीरामांची मोठी पंचाईत झाली आहे. काहीजण खिशाला अधिकचा भार देऊन जोखीम पत्करत 'बाटली'ची सोय करीत आहेत. मात्र, लॉकडाऊनचा वाढलेला कालावधी पाहून तेही परवडण्यासारखे नसल्याने तळीरामांनी स्वदेशी अर्थात मोहाच्या दारुकडे मोर्चा वळवल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मोहाची दारू बनवणाऱ्या आदिवासी बांधवांचीही आर्थिक चणचण दूर झाली आहे.

वाचा अपडेट : ठाणेकरांनो घरातच रहा, कोरोनाचा धोका वाढतोय

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात लॉकडाऊनमुळे तळीरामांनी आपला मोर्चा गावखेड्यांकडे वळविला आहे. सध्या मोहाच्या फुलाचा हंगाम सुरू असून खर्डी, टेंभा, भोसपाडा, पाचआंबा, काष्टी, दहीगाव, अजनुप, जरंडी, डोळखाब, किन्हवली, वाशाळा यासारख्या गावांत मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.

या झाडांची फुले वेचून आदिवासी बांधव स्वतःला पिण्यासाठी दारू बनवत असतात. परंतु लॉकडाऊनमध्ये शहरी व ग्रामीण भागात ब्लॅकने मिळणाऱ्या देशी/विदेशी दारूला भाव चढल्याने तळीरामांनी आदिवासी वस्तींवरील मोहाच्या गावठी दारूकडे मोर्चा वळविला आहे. या दारुचा भावही विदेशीपेक्षा स्वस्त असल्याने तळीराम आपली तलफ भागवित आहेत.

क्लिक करा : लॉकडाऊनमुळे ऑनलाईन गेमिंगला पसंती

मोहाच्या दारूचा परवानगीची मागणी
   शहापुरातील खेड्यापाड्यात व आदिवासी वाड्यावस्तीवर मोहाची फुले सुकवून ही दारू बनवली जाते. सरकार दरबारी गावठी दारू भट्ट्या बंद केल्या असल्या तरी चोरीछुपे दारू उपलब्ध होतेच. त्यातच विदेशी दारू पिणाऱ्यांकडून मोहाच्या दारुची मागणी वाढू लागल्याने व आदिवासींची आर्थिक चणचणही दूर होत असल्याने सरकारने मोहाच्या फुलापासून तयार केलेल्या दारूला परवानगी द्यावी, अशी मागणी खासगीत केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Difficult to get foreign alcohol ... Increasing demand for cane alcohol