esakal | जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलेल्या 'त्या' व्हिडिओवर दोन मतप्रवाह
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra-Awhad

जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलेल्या 'त्या' व्हिडिओवर दोन मतप्रवाह

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत रेल्वे स्थानकात (Railway station) अनेक गुन्हे घडत असतात. अलीकडेच रेल्वे स्थानकात महिला पोलीस (women police) एका युवकाला काठीने बदडून काढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. दारुच्या नशेत (influence under alcohol) युवकाने महिला पोलिसाची छेड काढली. त्यानंतर या महिला पोलिसाने त्या युवकाला काठीने चांगलंच चोपून काढलं. (Diffrent opinions on video posted by jitendra awhad wadala railway station incident where railway women constable beat accused dmp82)

मुंबईत वडाळा रेल्वे स्थानकात काही दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. छेडछाड करणाऱ्याला धडा शिकवल्यानंतर पुन्हा असा प्रकार केलास, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला. या घटनेमधील आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. व्हिडिओमध्ये महिला छेडछाड करणाऱ्या युवकाला चोप देताना दिसतं आहे.

हेही वाचा: ठाण्यात हाय वे वर २० हजार किलो टॅामेटो भरलेला ट्रक पलटी

व्हायरल झालेला हा व्हिडिओ आता राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या टि्वटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी हा प्रकार अमानुष आहे कारवाई झालीच पाहिजे, असं म्हटलं आहे. गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि डीजीपी महाराष्ट्रला त्यांनी टॅग केलं आहे.आव्हाडांच्या या ट्विट नंतर समाजमाध्यमावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, ही मारहाण योग्य होती, तर काही लोकांनी आव्हाडांना समर्थन दिलंय.

loading image