

Maharashtra Dighi Shipbuilding Cluster Set for Growth With 7000 Crore Investment and Mazagon Dock Shipbuilders Partnership
sakal
अलिबाग: जिल्ह्यातील दिघी येथे उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतीक्षित ‘ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहा’ला (शिपबिल्डिंग क्लस्टर) मोठी गती मिळाली आहे. या समूहात अत्याधुनिक जहाजबांधणी केंद्र उभारण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात मंगळवारी (ता. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार केला.