

Technical Glitch Disrupts Vidhan Bhavan Entry, MLAs and Journalists Struggle
sakal
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, आज डिजिटल फेस रेकग्निशन (चेहरा पडताळणी) प्रणालीवरून विधानभवन परिसरात एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. विधानभवनातील प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित व सुलभ करण्यासाठी ही नवीन व्यवस्था असल्याचे प्रशासनाने जाहीर केले खरे, मात्र या प्रणालीत अनेक तांत्रिक त्रुटी राहिल्याने याचा अनेकांना फटका बसला.