दिलीप कुमार यांचा वाढदिवस साधेपणाने

पीटीआय
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा 94 वा वाढदिवस रविवारी (ता. 11) रुग्णालयात साजरा करण्यात आला. त्यांच्यासह पत्नी सायरा बानो होत्या. दिलीप कुमार यांनी रुग्णालयातील खोलीत केक कापत असल्याची छायाचित्रे ट्विटरवरून शेअर केली आहेत. "केक कापण्यास सायराने मला मदत केली,' असे ट्विटही त्यांनी केले आहे. तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'तुमचे प्रेम व हृदयापासून पाठविलेले संदेश वाचून मी इतका भारावून गेलो, की माझ्या डोळ्यात अश्रू आले,'' असे दिलीप कुमार यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

उजव्या पायाला सूज आल्याने त्यांना गेल्या मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dilip kumar birthday celebration