

Businessman was robbed by posing as police officer
ESakal
मुंबई : पोलीस आयुक्त, सहआयुक्तांसह अन्य पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एन्काउंटरची भीती घालत पश्चिम उपनगरात राहणाऱ्या व्यावसायिकाकडून तब्बल एक कोटी रुपयाची खंडणी उकळण्यात आली. त्यानंतर आत्महत्येसाठी निघालेल्या व्यावसायिकाला शोधल्यानंतर त्याने याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.