

Beating to disabled person in mumbai local
ESakal
मुंबई : दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव डब्यात प्रवेश करून एका दिव्यांग प्रवाशाला मारहाण केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी ४५ वर्षीय महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई घटना घडल्यानंतर अवघ्या १२ तासांत करण्यात आली. कर्जत जलद लोकलच्या दिव्यांग डब्यात शुक्रवारी (ता. २७) दुपारी २.४५ वाजता ही घटना घडली.