माथेरानमधील पॉइंटवर निसर्गाचा आनंद घेताना पर्यटक
माथेरानमधील पॉइंटवर निसर्गाचा आनंद घेताना पर्यटक

माथेरानमध्ये पर्यटकांवर सवलतीचा वर्षाव

माथेरान : माथेरानमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी माथेरानमधील हॉटेल व्यावसायिक, दुकानदारांनी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. मनोरंजनाबरोबरच सुंदर जोडप्याला बेस्ट कपल अवॉर्ड दिला जाणार आहे. तसेच जेवणामध्ये परदेशी थाळ्यांसह, मोघलाई, पंजाबी, साऊथ इंडियन, गुजराती थाळीचा समावेश आहे.

गेल्या पाच महिन्यांत माथेरानकडे पर्यटकांनी अक्षरशः पाठ फिरविली होती. त्यामुळे पर्यटन व्यवसाय डबघाईला आला होता. पण सरत्या वर्षाच्या शेवटी मिनी ट्रेनची शटल सेवा सुरू करून मध्य रेल्वे प्रशासनाने पर्यटकांना भेट दिली आहे. त्यामुळे माथेरानमधील पर्यटक संख्या वाढत आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथील व्यावसायिकांनी हॉटेलचे दर कमी केले असून जेवणामध्ये सवलत दिली आहे. येथील हॉर्स लॅन्ड हॉटेल, स्प्रिंगवूड हेरिटेज, कुमार प्लाझा या हॉटेलने दर कमी करून पर्यटकांना दिलासा दिला आहे.

नगरपालिकेकडून मोफत ऑर्केस्ट्रा 
हॉटेलमध्ये राहणाऱ्या पर्यटकांसाठी जेवणासह डिस्को मोफत, लहान मुलांना आनंद देण्यासाठी पपेट शो, जगलर शो, मॅजिक शो, तसेच कुटुंबीयांसाठी करा ओके, हौजी, इसकी टोपी उसके सर, म्युझिकल कॅप असे मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच हॉटेलमध्ये आलेल्या जोडप्याला बेस्ट कपल अवॉर्ड दिला जाणार आहे. खाद्यान्नगृहे यांनी जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खाना खजाना अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या आणि मोठ्या कुटुंबीयांसाठी भेटवस्तू देण्यात येणार आहेत. माथेरान नगरपालिकेने पर्यटकांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करत माथेरानचे नौरोजी उद्यान व पेमास्टर उद्यान येथे मोफत ऑर्केस्ट्रा असणार आहे. 

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रति माणसी 1600 रुपयांमध्ये राहण्यासह जेवण, मनोरंजन, डिस्को आणि गिफ्ट कूपन असे पॅकेज देणार आहे. कार्यक्रमात विजयी कुटुंबाला गोवा सहल मोफत दिली जाणार आहे. 
प्रसाद सावंत, व्यवस्थापक, हॉर्सलॅंड हॉटेल 

पाच महिन्यात पर्यटकांचे प्रमाण खूप कमी होते. आता मिनी ट्रेनसुद्धा सुरू झाली असून पर्यटक वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक यावेत, यासाठी चिकन थाळी, मच्छी थाळीचा दर कमी केला आहे. पापलेट थाळी व सुरमई थाळी फक्त 300 रुपयांत देणार आहे. तसेच वेगवेगळ्या मच्छीच्या प्रकारांची मेजवानी पर्यटकांना चाखता येणार आहे. ज्या कुटुंबीयांचे बिल एक हजारापेक्षा जास्त होईल, त्यास भेट वस्तू दिली जाणार आहे. 
दीप्ती सुतार, व्यवस्थापक, मालक, कोकण कट्टा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com