esakal | मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आज मुंबईत 'मोठी' बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आज मुंबईत 'मोठी' बैठक

आज सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या बैठकीत मराठा आरक्षणावर कोर्टाकडून लावण्यात आलेली स्थगिती कशी उठावात येईल गहन चर्चा केली जाणार आहे

मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आज मुंबईत 'मोठी' बैठक

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, केंद्रीय न्याय आणि विधी मंत्री रविशंकर प्रसाद, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आणि सरकारचे कायदेविषयक सल्लागार आणि तज्ज्ञ यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. यामधील काही मान्यवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या, माध्यमातून बैठकीत सामील होणार आहेत. आज (रविवारी) सह्याद्री अतिथिगृहावर ही हाय व्होल्टेज बैठक पार पडणार आहे.  

महत्त्वाची बातमी : चार वर्षाच्या मुलाला सावत्र पित्याकडून इस्त्रीचे चटके; आजीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती  दिली गेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरु आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका देखील करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाकडून मराठा आरक्षण टिकवण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही असे आरोप देखील केले जात आहेत. अशात येत्या काही दिवसांत सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबाबत पुढील सुनावणी सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृहावर घेतली जाणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 

आज सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या बैठकीत मराठा आरक्षणावर कोर्टाकडून लावण्यात आलेली स्थगिती कशी उठावात येईल गहन चर्चा केली जाणार आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यासाठीचे तांत्रिक मुद्दे चर्चिले जाणार आहेत. तांत्रिक कंगोऱ्यांवर चर्चेनंतर सरकार आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडणार असल्याने आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. 

to discuses further strategy on maratha reservation important meeting will be held in mumbai

loading image