

Dharavi redevelopment project
ESakal
धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी धारावी बचाव आंदोलनाच्या शिष्टमंडळासोबत सोमवारी सकारात्मक चर्चा केली. धारावीमध्ये आयोजित केलेल्या मोर्चानंतर पार पडलेल्या या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. स्थानिकांच्या अल्प प्रतिसादात पार पडलेल्या या मोर्चात विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.