esakal | शिक्षणमंत्र्यांशी ‘टीईटी’ बाबत चर्चा Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

शिक्षणमंत्र्यांशी ‘टीईटी’ बाबत चर्चा : आरोग्यमंत्री टोपे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘आरोग्य खात्याच्या परीक्षा वेळेत होतील ; ‘टीईटी (TET) ’बाबत विचार करण्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याशी चर्चा केली आहे,’’ असे राज्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी मंगळवारी सांगितले. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. या परीक्षांसाठी आणखी महिनाभराचा अवधी असल्याने मार्ग काढण्यात येईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, ठरलेल्या तारखेलाच ‘टीईटी’ची परीक्षा घेण्यासाठी शिक्षण खाते आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या ३१ ऑक्टोबरला नेमकी कोणती परीक्षा होणार, याच्या निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. आरोग्य खात्यातील सेवकांच्या ‘क’ आणि ‘ड’ गटासाठीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर त्या येत्या २४ आणि ३१ ऑक्टोबरला घेण्याची घोषणा टोपे यांनी सोमवारी केली. मात्र, ३१ ऑक्टोबरला ‘टीईटी’ची परीक्षा असल्याने आरोग्य खात्याच्या परीक्षांबाबत नवा गोंधळ निर्माण झाला आहे.

हेही वाचा: विद्यार्थ्यांच्या त्रासाला जबाबदार कोण ?; पाहा व्हिडिओ

टोपे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या नुकसान होणार नाही, याकरिता ‘टीईटी’ परीक्षेच्या वेळापत्रकाचा विचार करण्याची विनंती गायकवाड यांना केली आहे. शिक्षण संचालकांशी बोलून निर्णय घेण्यात येणार आहे.’’

loading image
go to top