
मुंबई: माझ्या पराभवाला पक्षातील काही वरिष्ठ मंडळी कारणीभूत असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी विधानसभेतील निवडणुकीतील त्यांच्या पराभवाचे खापर पक्षातील नेत्यांवरच फोडले आहे. विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर मी नाराज होतो आणि नाराज असल्याचे सांगत शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाहेर पडण्याचे सूतोवाच त्यांनी दिले आहेत.