दिशा सालियान मृत्यूचा CBI मार्फत तपास करा, सुशांतच्या मित्राची मुंबई हायकोर्टात याचिका

सुनीता महामुणकर
Friday, 30 October 2020

दिशाचा मृत्यू हा सुशांतच्या मृत्यूच्या आधी सहा दिवस 6 जून रोजी मालाडमधील एका निवासी इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरुन पडून झाला होता.

मुंबई, ता. 30 : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी सुशांतच्या मित्राने याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. सुशांतचा मित्र सुनील शुक्लाने ही याचिका केली असून दिशाचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या आहे असा त्यामध्ये दावा केला आहे.

दिशाचा मृत्यू हा सुशांतच्या मृत्यूच्या आधी सहा दिवस 6 जून रोजी मालाडमधील एका निवासी इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरुन पडून झाला होता. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक त्रुटी असून अनेक महत्वपुर्ण बाबींंकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप या माध्यमातून केला आहे. ज्या ठिकाणी दिशाचा मृतदेह आढळला होता ती जागा इमारतीच्या जवळ नसून थोड्या अंतरावर (15 मीटर) आहे. म्हणजे तीला कोणीतरी दोन व्यक्तींनी वरुन फेकले असावे, असा अंदाज याचिकेत व्यक्त केला आहे. ती आणि तिचा मित्र या इमारतीत पार्टीला गेले होते. पण तिथे हजर असलेल्या व्यक्तींचा जबाबही पोलिसांनी अजून नोंदवला नाही आणि तिच्या मित्राचीही चौकशी केली नाही, असा आरोप केला आहे. 

महत्त्वाची बातमी : उद्या मंत्रालय गहाण ठेवणार का? ST कर्जप्रकरणी दरेकर यांची तिखट प्रतिक्रिया

या इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे तेथे कोण आले हे देखील गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या संशयास्पद मृत्यूचा सीबीआय तपास हवा असे याचिकादाराचे म्हणणे आहे. 

दिशाच्या मृत्यूबाबत महत्त्वाचे कागदपत्रे असल्याचा दावाही याचिकेत केला आहे. मुंबई पोलिसांनी वरवर तपास केला असून अनेक दुवे दुर्लक्षित केले आहेत, असा आरोप शुक्ला यांनी केला आहे. पुढील आठवड्यात याचिकेवर सुनावणी होणार आहे. यापूर्वी सीबीआय तपासाबाबत अन्य एक याचिका दाखल झाली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

disha salian case must be investigated by CBI friend of sushant files petition in bombay high court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: disha salian case must be investigated by CBI friend of sushant files petition in bombay high court