टॉयलेटसाठी शिवसेना भाजपमध्ये राडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

एकीकडे केंद्रात व राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता असतानाच आज मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील दहिसर पूर्व येथील केतकी पाड्यात शौचालयाच्या उद्घाटनावरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून आले. याप्रकरणी दोन्ही गटाकडून आपणच वनविभागाची परवानगी घेतल्याचा दावा करण्यात येत आहे.

मुंबई : एकीकडे केंद्रात व राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता असतानाच आज मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील दहिसर पूर्व येथील केतकी पाड्यात शौचालयाच्या उद्घाटनावरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून आले. याप्रकरणी दोन्ही गटाकडून आपणच वनविभागाची परवानगी घेतल्याचा दावा करण्यात येत आहे.

केतकीपाडा धारवाडी एमएलडीसी कंपाऊंड येथे बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्याहस्ते आज सायंकाळी चार वाजता करण्यात येणार होते. त्यासाठी विभागात सर्वत्र फलकबाजी करण्यात आली होती. मात्र, भाजपचे विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर यांनीही सकाळी अकरा वाजता उद्घाटनाचा फलक काल सायंकाळी परिसरात लावला.

याची कुणकुण लागताच आज सकाळी आमदार प्रकाश सुर्वे, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस,नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, संजय घाडी, संजना घाडी, प्रकाश पुजारीसहित शिवसैनिकांनी शौचालयावर गर्दी केली तर, दुसरीकडे भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता,प्रकाश दरेकर, प्रदीप नायर सहित कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सेना- भाजपचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disputes between Shivsena and BJP for toilet