
डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील नवीन पलावा पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर त्यावर दोन दुचाकीस्वारांचे अपघात झाले. हे अपघात म्हणजे निष्काळजीपणा आणि राजकीय गाफीलपणा आहे. त्याविरोधात आम्ही कायदेशीर लढा देणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली. कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत त्यांनी निष्काळजी पणा करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावे असे निवेदन दिले. पोलीस उपायुक्तांनी याची सखोल चौकशी करू असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.