Thane News: रेल्वे स्थानक बाहेरील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करा, दिवा शहर नागरी हक्क समितीचा इशारा

Illegal Hawkers : दिवा रेल्वे स्थानक बाहेरील परिसरातील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी दिवा शहर नागरी हक्क समितीने केली आहे.
Civil Rights Committee demands action against illegal hawkers

Civil Rights Committee demands action against illegal hawkers

ESakal

Updated on

डोंबिवली : दिवा शहर नागरी हक्क समितीच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समितीकडे दिवा रेल्वे स्थानक बाहेरील परिसरातील वाढत्या बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीपूर्वी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन आणि रास्ता रोको करणारे भाजप पदाधिकारी मात्र आता शांत झाल्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com