esakal | दिवा पाण्यासाठी तहानलेला; भाजपने काढला हंडा कळशी मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

दिवा पाण्यासाठी तहानलेला; भाजपने काढला हंडा कळशी मोर्चा

दिवा पाण्यासाठी तहानलेला; भाजपने काढला हंडा कळशी मोर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिवा : दिवा शहरात गेल्या 10 ते 15 वर्षांपासून पाणी प्रश्न वाढला आहे. तर गेल्या मागील काही महिन्यांपासून पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. दिव्यात वाढती लोकसंख्या पाहता पाणी पुरवठा कमी पडत आहे. यासाठी दिवा भाजप शिळ मंडळाने आज महिलांच्या पाणी समस्या ऐकून  पालिकेवर हंडा कळशी मोर्चा काढला पण त्यावेळी पाणी अभियंते व अधिकारीच जागेवर नसल्याने संतप्त महिला ठिय्या आंदोलनाला बसल्या.

दिव्यात वाढत्या अनधिकृत बांधकामांमुळे निर्माण झालेली पाणी टंचाईने नागरिक हैराण आहेत. दिव्यात सगळीकडे नागरीकरणाच्या संमस्यानी डोकं वर काढलेल आहे. पण पिण्याच्या पाण्यासाठी ही रात्रभर दिवेकराना जागाव लागत आहे. ही पाणी टंचाई आहे की कृत्रिम पाणी टंचाई केली जात आहे असा सवाल महिला करत आहेत. दिव्यात टँकर साठी पाणी आहे पण नागरिकांसाठी पाणी नाही ही शोकांतिका आहे असे नागरिक सांगतात. या टँकरचे पाणी विकत घेऊन आम्ही किती दिवस काढणार. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. अशा घोषणा देत आज दिवा पश्चिम च्या पालिका कार्यालयावर भाजपा सोबत महिलांनी हंडा कळशी मोर्चा नेला.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 3: भावाची बाजू घेतल्यानं आदर्श शिंदे ट्रोल

दिव्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तसेच नळाला पाणी न आल्यास त्यांना नेहमी पाणी विकत घ्यावे लागते. ठाणे पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवक पाणी समस्या गंभीर नसल्याने आम्हा नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. त्यामुळे आज भाजप दिवा- शीळ मंडळ नेतृत्वाखाली दिवेकरांनी मोठ्या प्रमाणात हंडा- कळशी मोर्चा काढला. दिवा गाव, गणेश चौक, गावदेवी मंदिर परिसर, क्रिश कॉलोनी, बालदा नगर, एन आर नगर येथील हजारो महिला हंडी-कळशी घेऊन मोर्च्यात सामील झाल्या होत्या. ही परिस्थिती त्वरित सुधारली नाही तर ह्यापेक्षा ही तीव्र आंदोलन करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. या आंदोलनात भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरर्जन डावखरे, भाजप पदाधिकारी अँड आदेश भगत, नीलेश पाटील, रोहिदास मुंडे, अशोक पाटील, विनोद भगत, रोहन भगत, विजय भोईर, गणेश भगत, अजय सिंग, युवराज यादव, समीर चव्हाण, ठाणे नगरसेवक संजय वाघुले, जयदीप भोईर, श्रीधर पाटील, निखिल पाटील, समशेर यादव, संदेश भगत, अमरनाथ गुप्ता, सुप्रिया भगत, अर्चना पाटील, सीमा भगत, संगीता भोईर, रेश्मा पवार, शिला गुप्ता आणि हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.

loading image
go to top