Diva News : प्रवाशांचा उडाला गोंधळ! वीज येताच सरकता जिना उलट्या बाजूने सुरु झाला, काही महिला पडता पडता वाचल्या

दिव्यातील रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा आज पन्हा चव्हाट्यावर आलेला दिसला.
diva railway station escalator
diva railway station escalatorsakal

दिवा - दिव्यातील रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा आज पन्हा चव्हाट्यावर आलेला दिसला. आज दुपारी अडिचच्या सुमारास वीज नसल्याने वर जाणारा सरकता बंद होता. पण त्याचवेळी वीज आल्याने तो सरकता जिना उटल्या म्हणजे उतरत्या बाजून सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

दिवा रेल्वे स्टेशनला 2019 ला सरकता जिना बसवण्यात आला. हा जिना जरी प्रवाशांच्या सोयीसाठी लावला असला तरी तो दिवसातून किमान 2 ते 3 वेळा बंद पडतोच. हा जिना फलाट एक आणि दोनच्या मध्ये मधल्या ब्रिजला जोडलेला आहे.

दुपारी अडिचच्या वाजता बंद सरकत्या जिन्याचा वापर प्रवाशी करत असताना तो अचानक सुरु होऊन वर जाण्या ऐवजी तो उलट्या बाजूने सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. त्या प्रवाशांमधील दोन महिला पडता पडता वाचल्या. असा अचानक झालेला हा बदल नागरिकांच्या ताबतोब लक्षात आला नाही.

पण हे कळताच काही नागरिकांना सरकता जिना उतरुन दुसऱ्या जिन्याचा वापर केला. हा जिना गेल्या दोन महिन्यांआधी एक ते दिड महिना बंद होता. तसेच आता ही त्यावर चालताना खडखड असा आवाज येतो. दिव्यातील पश्चिमेला मधल्या ब्रिजला पालिकेची शाळा आणि तेथे जास्त लोकवस्ती असल्याने या सरकत्या जिन्याचा वापर लहान मुले, अपंग, वयोवृध्द, गरोदर महिला, महिला, नागरिक नेहमी करतात.

या जिन्याच्या सारख्या तक्रारी प्रवाशांकडून येत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या जिन्याच्या तक्रारीकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे, असे प्रवाशांचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com