Guru Padhuka Darshan : ‘सद्गुरू वाचोनि सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी...’ अशी भावना मनात बाळगलेल्या हजारो गुरूभक्तांना दोन दिवस संत व सद्गुरूंच्या पादुकांवर नतमस्तक होण्याचा योग आला.
मुंबई : टाळ-मृदंगाच्या साथीने केलेला संतांच्या नामाचा गजर, अखंड ऐकू येणारी भक्तिगीते आणि पादुकादर्शनाने समाधानी झालेले असंख्य चेहरे... अशा भक्तिमय वातावरणात संत आणि सद्गुरूंच्या पादुकादर्शन सोहळ्याच्या दैवी पर्वणीची रविवारी सांगता झाली.