विधानसभेपूर्वी मतदान केंद्राचे विभाजन

विधानसभेपूर्वी मतदान केंद्राचे विभाजन

विधानसभेपूर्वी मतदान केंद्रांचे विभाजन
गृहनिर्माण संस्थांतील मतदान केंद्र वाढविण्यावर भर 
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ११ : लोकसभा निवडणूक  नुकतीच पार पडली असून येत्या काही  महिन्यांत विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेऊन प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एका मतदान केंद्राचे मतदार १२०० ते १३०० पेक्षा जास्त नसावेत. त्यामुळे मुंबई शहरातील मतदान केंद्रांचे विभाजन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली.
  यादव म्हणाले की, मतदारांना मतदान करणे अधिक सुलभ व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. मतदान केंद्राचे विभाजन करण्यासाठी जास्त वेळ आवश्यक आहे. मतदान परिसरानुसार मतदान केंद्र फोडून त्याची पुनर्रचना  करावी लागणार आहे.  
जास्तीत जास्त मतदान केंद्र हाऊसिंग सोसायट्यांमध्ये हलविण्यात यावेत , असा प्रस्ताव निवडणूक  आयोगाला देणार आहोत, असे मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले. मोठमोठ्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये हे मतदान केंद्र असणार आहेत. सध्या ६९ हाऊसिंग सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये आणखी वाढ केली जाणार आहे. त्यामुळे मतदाराला इमारतीतच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध होईल.   

 जे लोक हयात नाहीत, त्यांचे नाव कमी केले पाहिजे, राहण्याचे ठिकाण  बदलले असल्‍यास बदललेल्या यादीत नाव असावे यासाठी मतदार यादीचे शुद्धीकरण केले जाणार आहे. त्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागणार आहे. कारण आमच्याकडे मनुष्यबळ कमतरता असून पुढील निवडणुकीपूर्वी शुद्धीकरण केले जाणार आहे. 
संजय यादव
जिल्हाधिकारी, मुंबई शहर 
---
मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारांची माहिती
एकूण मतदार : २४ लाख ९० हजार २३८
एकूण पुरुष ः १३ लाख ४३ हजार ९६९
एकूण स्त्री ः ११ लाख ४६ हजार ०४५
एकूण तृतीयपंथी ः २२४


मतदान केंद्रांची माहिती
एकूण मतदान केंद्र ः २ हजार ५२०
एकूण सहाय्यकारी मतदान केंद्र ः ०८
एकूण सखी महिला मतदान केंद्र ः ११
नवयुवकांसाठी मतदान केंद्र ः ११
दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र ः ०८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com