Diwali Festival 2020 : यंदा नागरिकांना भुरळ घालतायत खास खणाचे मनमोहक कंदील, तुम्ही कोणता घेतलाय ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival 2020 : यंदा नागरिकांना भुरळ घालतायत खास खणाचे मनमोहक कंदील, तुम्ही कोणता घेतलाय ?

पारंपारिक पद्धतीने तयार केलेला हा कंदील आपली संस्कृती जपतो. दुसरं म्हणजे लाकडापासून तयार केलेल्या या कंदिलाचे रूपांतर लॅम्प शेडमध्येही करता येते.

Diwali Festival 2020 : यंदा नागरिकांना भुरळ घालतायत खास खणाचे मनमोहक कंदील, तुम्ही कोणता घेतलाय ?

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई, 12 : दिवाळीच्या खरेदी साठी मुंबईकर मुंबईतील बाजारात गर्दी करत आहेत. कोरोनाचे संकट असल्यामुळे अनेकांकडून दिवाळी साधेपणाने साजरी करण्यावर भर दिला जात आहे. दिवाळीसाठी दाराबाहेर कंदील हे मुख्य आकर्षण असते. अशात सध्या बाजारात नव्या प्रकारचे, अतिशय आकर्षक असे दिवाळी कंदील उपलब्ध झाले आहेत. ज्यात खणाच्या कापडापासून तयार केलेल्या कंदिलाची यंदा क्रेझ वाढती आहे. 

डोंबिवलीच्या पेशाने वकील असलेल्या श्रेया मराठे यांनी त्यांच्या सहकारी श्रुती यांच्यासोबत हा नवा ट्रेंड सुरू केला आहे. श्रेया यांनी आपल्या छंदापोटी हा व्यवसाय सुरु केला असुन या सुंदर आणि आकर्षक आकाशकंदीलांना विशेष मागणी आहे. श्रेया यांनी या कंदिलाच्या कल्पनेसाठी बराच रिसर्च केला. या कंदिलासाठी कोणते कापड लागेल? त्याची कशी फ्रेम असेल? या सर्वांचा योग्य निर्णय घेऊन हे कंदील वेगळ्या रुपासह बाजारात दाखल झाले आहेत. 

महत्त्वाची बातमी "खेळ तर आता सुरु झाला आहे उद्धव ठाकरे", जेलमधून बाहेर आल्यानंतर अर्णब यांची प्रतिक्रिया

श्रेया यांचे कंदील बनवण्याचे हे पहिलेच वर्ष असून सुरुवातीच्या काही दिवसातच 100हून अधिक जणांनी या कंदीलाची मागणी केली होती. मात्र, आता ही मागणी वाढली असून रात्रभर जागून हे कंदील तयार करुन घरोघरी पाठवले जात आहेत. 

पारंपारिक पद्धतीने तयार केलेला हा कंदील आपली संस्कृती जपतो. दुसरं म्हणजे लाकडापासून तयार केलेल्या या कंदिलाचे रूपांतर लॅम्प शेडमध्येही करता येते. लाकडापासून तयार झाल्यामूळे हा कंदिल कितीही वर्ष टिकून राहू शकतो. 

2018 पासून मी खणापासून वेगवेगळ्या प्रकारचे काही वस्तू तयार करत आहे. यावर्षी कंदील बनवले गेले. 150 कंदील आम्ही तयार केले होते. पण, अगदी काही दिवसांतच त्याची विक्री झाली. या कल्पनेला लोकांचा भरभरून प्रतिसाद आणि कौतूक झाले आहे असं श्रेया मराठे म्हणाल्यात . 

( संपादन - सुमित बागुल )

diwali festival 2020 special khun saree lanterns are in demand for this diwali

loading image
go to top