"खेळ तर आता सुरु झाला आहे उद्धव ठाकरे", जेलमधून बाहेर आल्यानंतर अर्णब यांची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"खेळ तर आता सुरु झाला आहे उद्धव ठाकरे", जेलमधून बाहेर आल्यानंतर अर्णब यांची प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाकडून चूक झाल्याचं म्हणत अर्णब यांना जामीन मंजूर केला.

"खेळ तर आता सुरु झाला आहे उद्धव ठाकरे", जेलमधून बाहेर आल्यानंतर अर्णब यांची प्रतिक्रिया

मुंबई : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांकडून त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आलेली. अटकेनंतर अर्णब यांना अलिबाग न्यायालयात सादर करण्यात आलं. न्यायालयाने अर्णब यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अर्णब यांनी लगेच आपल्या जामिनासाठी अर्ज केलेला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाकडून अर्णब यांना अपेक्षित असा निकाल न आल्याने त्यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाकडून चूक झाल्याचं म्हणत अर्णब यांना जामीन मंजूर केला. काल अर्णब यांची तळोजा जेलमधून सुटका झाली. अर्णब जेलमधून बाहेर येताना अर्णब यांच्या समर्थकांनी तळोजा जेलबाहेर मोठ्या प्रमाणात गराडा घातला होता. 

महत्त्वाची बातमी : कोरोनासाठी महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयांचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून कौतुक

मिळालेल्या माहितीनुसार अर्णब यांची जेलमधून सुटका झाल्यावर पहिल्यांदा ते आपल्या कार्यालयात गेलेत तेंव्हा त्यांनी "उद्धव ठाकरे खेळ तर आता सुरु झाला आहे", अशी प्रतिक्रिया दिली. एकंदरच अर्णब गोस्वामी हे आपल्या आक्रमक शैलीत पाहायला मिळाले असं देखील बोललं जातंय. काही माध्यमाच्या माहितीप्रमाणे अर्णब म्हणालेत की, "उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफी देखील मागितली नाही. आता मी प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरु करणार. मी जेलमधून वाहिनी सुरु करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही. खेळ तर आता सुरु झाला आहे", असं देखील अर्णब गोस्वामी म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी :  ग्रीन फटाक्यांतही आढळलेत धोकादायक केमिकल्स, लहान मुलांपासून असे फटाके दूरच ठेवा

त्यामुळे येत्या काळात अर्णब गोस्वामी विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद अधिक तीव्रतेने पेटण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

first reaction of arnab goswami after coming out from taloja jail anvay naik case

loading image
go to top