काहीही करा, आम्ही नियम मोडणारच!

वसई ः नाकाबंदीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर  लक्ष ठेवताना वाहतूक पोलिस.
वसई ः नाकाबंदीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवताना वाहतूक पोलिस.

वसई  ः वसई तालुक्‍यात विविध ठिकाणी नाकाबंदी, वाहन तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन, मद्यप्राशन करणारे चालक यांच्याकडून जानेवारी ते डिसेंबर २०१९ पर्यंत ४ कोटी २० लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल करून १० लाख वाहनांवर वसईच्या वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

अपघात, वाहतूक कोंडी होऊ नये; तसेच वाहतूक सुरळीत असावी, यासाठी वाहतूक पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येते; परंतु त्यानंतरही काही चालक बेशिस्तपणे वाहने चालवत असतात. नियमांचे उल्लंघन करत असतात, अशांना चाप लावता यावा, म्हणून वाहतूक विभागातर्फे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सुपे यांनी धडक मोहीम हाती घेत वर्षभरात वसई तालुक्‍यात ठिकठिकाणी कारवाई केली आहे.

यात चार कोटी दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याने अनेक वाहनचालक हे नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचे समोर आले आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणे, परवाना उल्लंघन, अवैध प्रवासी वाहतूक, धोकादायक वाहन चालवणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, सिग्नल नियम तोडणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, दुचाकीवरून तीन आसनी प्रवास, ना वाहनतळ क्षेत्रात वाहने उभे करणे, सीट बेल्ट नसणे, विनाहेल्मेट गाडी चालवणे, काळ्या काचा तसेच अन्य वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वर्षभरात कारवाई करण्यात आली आहे.

३ हजारांवर चालक मोबाईलवर
वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये, यामुळे अपघात होतात, याबाबत वारंवार जनजागृती केली जाते; परंतु याकडे दुर्लक्ष करून बिनधास्तपणे मोबाईलवर संभाषण केले जाते. वाहतूक पोलिस याबाबत जनजागृतीदेखील करतात; मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही. वर्षभरातील आकडा पाहता एकूण ३ हजार ३३६ चालक मोबाईलवर बोलताना आढळले असून त्यांच्याकडून ७ लाख १२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहनचालकांना नियमाची सवय लागावी, यासाठी वेळोवेळी जनजागृती, चर्चासत्रे घेतली जातात, तरीही काही वाहनचालक याकडे दुर्लक्ष करतात. कारवाईत अनेक जण नियमाचे उल्लंघन करत असताना आढळले असून ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
विलास सुपे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, वसई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com