esakal | असा करा हुकूमशाहीचा सामना.., वाचा शरद पवार काय म्हणाले..
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई : माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या गांधी शांती यात्रेला गुरुवारी गेट वे ऑफ इंडियापासून सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखविला. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर, म

गेट वे ऑफ इंडिया येथून शांती यात्रा मार्गस्थ

असा करा हुकूमशाहीचा सामना.., वाचा शरद पवार काय म्हणाले..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सरकारच्या हुकूमशाहीला गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाने उत्तर द्यायला हवे. सीएए आणि एनआरसी या कायद्यामुळे एकतेवर घाला घालण्यात आला असून, समाजात जागृती निर्माण करण्याची गरज आहे.  जेएनयूमध्ये जे काही झाले ते योग्य नसल्यानेच विरोध होत असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केले.

मोठी बातमी समाजहिताला जातीचे राजकारण धोकादायक - नागराज मंजुळे

आज माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी महात्मा गांधी शांती यात्रेचे गुरुवारी गेट वे ऑफ इंडिया येथून आयोजन केले होते. या यात्रेला शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही यात्रा ३१ जानेवारीला राजघाटावर पोचणार आहे. सीएए आणि एनआरसीबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कागदपत्र नसतील तर सरकारने निर्माण केलेल्या कॅंपमध्ये राहावे लागेल, अशी भीती वाटत आहे. देशात आज जी परिस्थिती आहे, त्यामुळे जनता सरकारवर नाराज आहे.

महत्वाचे कॉर्पोरेट मुंबईतही भरल्या पारंपरिक जत्रा, तुम्ही येताय ना ?

या परिस्थितीवर मात करण्यासाठी महात्मा गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाचा मार्ग स्वीकारला तरच संविधान वाचवता येईल, असे प्रतिपादनही पवार यांनी केले. या आंदोलनाला शांततेचा मार्ग आवश्‍यक आहे. यशवंत सिन्हा त्याच रस्त्यावर असून, या शांती यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी पवार यांनी केले.

हे वाचलेय का... कॉर्पोरेट मुंबईतही भरल्या पारंपरिक जत्रा, तुम्ही येताय ना ?

शरद पवार-प्रकाश आंबेडकर एकत्र 
शांती यात्रेच्या निमित्ताने शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज एकत्र आले. लोकसभा निवडणुकीपासून ‘राष्ट्रवादी काँग्रेससोबत नको’ या मुद्द्यावर ठाम राहात वंचितने काँग्रेससोबतही आघाडी केली नव्हती; तर शरद पवार यांनी भाजपला मदत करण्यासाठीच वंचित निवडणूक लढवीत असल्याचा आरोप केला होता. मात्र गुरुवारी हे दोन्ही नेते एकत्र आलेले पाहायला मिळाले.

Do so in the face of dictatorship 

loading image