
मुंबई : कोरोना विरोधातील लढाई अधिक तीव्र होत असताना अनेक मदतीचे हातही पुढे सरसावले आहेत. लॉकडाऊन वाढल्यामुळे कामगार, गरजूंना अधिक आर्थिक चणचण भासू लागली आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात अडकला असताना एकमेकांना मदत करा, एकजुटीने कोरोनाचा सामना करा असे आवाहन वारंवार सरकार तसेच कलाविश्वातील मंडळीही करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परिने मदतही करत आहे. अशातच ज्येष्ठ गायिक आशा भोसले यांनी एक अनोखं आवाहन जनतेला केले आहे. आशा भोसले यांनी
संपूर्ण जनतेशी संवाद साधत एकमेकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
100 रुपयांचे महत्त्व तुम्हाला माहित आहे का? आपण सगळ्यांनी प्रत्येकी 100 रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीला दिले पाहिजे. आपल्या देशातील 130 कोटी लोकांनी 100 रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधीला केली तर एकूण 13000 हजार कोटी रुपये जमा होतील. 100 रुपयांपेक्षा अधिक मदत करण्याची कोणाची इच्छा असेल तर ते ही तुम्ही करु शकता. कोरोना विरोधात लढण्यासाठी ही आर्थिक मदत उपयोगी पडेल असे आशा भोसले यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी जनतेला प्रोत्साहन देणारं एक गाणं देखील म्हटले आहे. `आओं बच्चों तुम्हें दिखाऐं झांकी हिंदुस्तान की` हे गाणं त्यांनी गायलं आहे. आशा भोसले यांनी जनतेशी संवाद साधताना गायलेलं हे गाणं खरंच कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये जनतेचं प्रोत्साहन वाढवणारं आहे.
कलाविश्वातील प्रत्येक मंडळी आज देशात निर्माण झालेल्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी एकवटली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटो शेअर करत जनतेला प्रोत्साहन करत आहेत. जनतेच्या सुरक्षिततेसाठी वारंवार आवाहन देखील करत आहेत. तर बऱ्याच मंडळींनी आर्थिक मदत करत केंद्र तसेच राज्य सरकारला आम्हीही तुमच्याबरोबर या लढ्यात उतरलो आहोत हे सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.