डॉक्टर तुम्हीसुद्धा ? सामान्यांना समजत नाही, पण डॉक्टरांनीच केलं असं काही, आता होतेय कडाडून टीका

डॉक्टर तुम्हीसुद्धा ? सामान्यांना समजत नाही, पण डॉक्टरांनीच केलं असं काही, आता होतेय कडाडून टीका

मुंबई : एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करतंय. अशात सामान्य नागरिक मुद्दामून, काहीतरी कारणाने बाहेर पडतात. म्हणून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन देखील १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आलाय. मात्र या सर्व संवेदनशील परिस्थितीत स्वतः आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गलथानपणा झाल्याचं तुम्ही ऐकलंय का?  नाही? मग हे वाचा... 

हा प्रकार घडलाय भिवंडीत. ठाण्याला लागून असलेल्या भिवंडी शहरातील वऱ्हाळदेवी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडलाय. कोविड रुग्णालयात काम करताना किंवा संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला खरंतर PPE किट परिधान करणं बंधनकारक आहे.

असं असतानाही एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवताना एका डॉक्टरनेच नियम धाब्यावर बसवलेत. या डॉक्टरने PPE किट तर परिधान केलं नव्हतंच पण मास्क देखील घातला नव्हता. या गंभीर प्रकारामुळे आता रुग्णालयांमधील हलगर्जीपणा आणखीन अधोरेखित झालाय. या दरम्यान, आता या सर्व प्रकारांची चौकशी करण्याची मागणी होतेय.

कोरोनाच्या घाबरवून टाकणाऱ्या काळात डॉक्टरांचा आपल्याला सर्वाधिक आधार आहे. अशात डॉक्टरचं जर चुकीच्या पद्धतीने वागलेत तर नागरिक देखील नियम धाब्यावर बसवतील आणि कोरोनाचं भीषण चित्र समोर यायला वेळ लागणार नाही. सध्या भिवंडीत कोरोना रुग्णसंख्या मोठी आहे. म्हणूनच महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी १९ जुलैपर्यंत भिवंडीत लॉकडाऊनचा आदेश जारी केला आहे.

doctor from bhiwandi did not used PPE kit and mask while keeping covid body in ambulance

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com