esakal | हॉस्पिटलमध्येच डॉक्टरचा नर्सवर जबरदस्तीचा प्रयत्न, नालासोपाऱ्यातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

rape case

हॉस्पिटलमध्येच डॉक्टरचा नर्सवर जबरदस्तीचा प्रयत्न, नालासोपाऱ्यातील घटना

sakal_logo
By
विजय गायकवाड : सकाळ वृत्तसंस्था

नालासोपारा: नालासोपारा (nalasopara) पूर्व संतोषभूवन येथील आरती हॉस्पिटल (hospital) मधील डॉक्टरने हॉस्पिटल मध्येच 21 वर्षीय नर्सचा जबरदस्तीने विनयभंग (molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत पीडित नर्सच्या (nurse) तक्रारीवरून शुक्रवार सायंकाळी उशिरा तुलिंज पोलीस ठाण्यात डॉक्टरच्या विरोधात 354, 354 (अ), 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सध्या डॉक्टर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Doctor molested nurse incident happened at nalasopara hospital)

डॉ सुशील मिश्रा असे आरोपी डॉक्टरचे नाव असून, नालासोपारा पूर्व संतोषभूवन, यु पी नाका येथील आरती हॉस्पिटलमध्ये तो पार्टनर आणि मॅनेजमेंटचे काम पाहतो. पीडित 21 वर्षीय युवती ही याच हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करीत होती. 23 जून रोजी रात्री 1 च्या सुमारास आरोपी डॉक्टर हा हॉस्पिटलमध्ये आला होता. त्यावेळी त्याठिकाणी पीडित नर्स ही कर्तव्यावर होती.

पीडित नर्सला कर्तव्यावर असताना झोपली आहे, असे कारण पुढे करून आरोपी डॉक्टरने नर्सला कन्सल्टंट रूम मध्ये बोलावले. मध्यरात्रीच्या सुमारास डॉक्टरने पीडित नर्सशी कन्सल्टंट रूममध्येच जबरदस्तीने अश्लील वर्तन केले. पीडित नर्सने कशीबशी त्याच्या तावडीतून स्वताची सुटका करून घेतली. हा सर्व प्रकार कुणाला सांगितला तर तुझे संपूर्ण करियर बरबाद करीन, माझी खूप मोठी ओळख आहे, अशा धमक्याही दिल्या होत्या.

हेही वाचा: मुंबईत लवकरच लहान मुलांवर होणार 'झायकोव्ह-डी' लसीची चाचणी

डॉक्टरच्या धमकीमुळे काही दिवस ही घटना समोर आली नाही. पण पीडित नर्सच्या घरच्यांना याची माहिती मिळाल्या नंतर कुटुंबातील सर्वांशी चर्चा करून, पीडित नर्स ने शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास तुलिंज पोलीस ठाण्यात येऊन डॉक्टर विरोधात तक्रार नोंदवली

loading image