esakal | मुंबईत लवकरच लहान मुलांवर होणार 'झायकोव्ह-डी' लसीची चाचणी
sakal

बोलून बातमी शोधा

kem hospital

मुंबईत लवकरच लहान मुलांवर होणार 'झायकोव्ह-डी' लसीची चाचणी

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईतील रुग्णालयांमध्ये (Mumbai City hospital) कोरोनाविरोधात नव्या लसींची चाचणी (new vaccine trial) करण्याची तयारी सुरु आहे. केईएम रुग्णालयात (Kem hospital) प्रौढांवर 'कोव्होव्हॅक्स' (Covovax) लसीच्या फेज दोन आणि तीनच्या चाचण्या होणार आहेत. नायर रुग्णालयात लवकरच 'झायकोव्ह-डी' लसीच्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या लहान मुलांवर सुरु होतील. 'झायकोव्ह-डी' लसीची चाचणी करण्यासाठी प्रौढांची नोंदणी करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. (Mumbai City hospitals to soon start trials of new Serum vaccine and ZyCoV-D for children)

केईएम आणि नायर दोन्ही रुग्णालयं एथिक्स कमिटीकडून मंजुरी मिळवण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने 'कोव्होव्हॅक्स' लसीची निर्मिती केली आहे. 'कोव्होव्हॅक्स' लस कितपत सुरक्षित आहे आणि लस घेतल्यानंतर किती प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते, ते तपासण्यासाठी २० वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या होणार आहेत. या २० पैकी आठ रुग्णालयं महाराष्ट्रातील आहेत.

हेही वाचा: काळ आला होता पण वेळ नाही; दादर रेल्वे स्थानकातील थरारक प्रसंग

चाचणीसाठी नोंदणी प्रक्रिया लवकर सुरु करु. सीरमच्या कोव्हिशिल्ड लसीची चाचणी सुद्धा के.ई.एममध्ये झाली होती, असे रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख म्हणाले. झायडस कॅडिला हेल्थकेअरने विकसित केलेल्या 'झायकोव्ह-डी' लसीची ५९ केंद्रांवर १२ ते १८ वयोगटातील मुले आणि ६५ वर्ष वयापर्यंतच्या व्यक्तींवर चाचणी सुरु आहे. त्यातील १४ केंद्र महाराष्ट्रात आहेत. मुंबईतील नायार, जे.जे. रुग्णालय या चाचणीचा एक भाग आहेत.

loading image