esakal | मुंबईकरांच्या मदतीला धावले वर्ध्यातील 45 डॉक्‍टरांचे पथक
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांच्या मदतीला धावले वर्ध्यातील 45 डॉक्‍टरांचे पथक

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वर्धा येथून डॉक्‍टरांचे पथक दाखल झाले आहे. हे वैद्यकीय पथक अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणार आहे. 

मुंबईकरांच्या मदतीला धावले वर्ध्यातील 45 डॉक्‍टरांचे पथक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वर्धा येथून डॉक्‍टरांचे पथक दाखल झाले आहे. हे वैद्यकीय पथक अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणार आहे. 

ही बातमी वाचली का? मोदींच्या भाषणानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणतात...

मे महिच्या अखेरपर्यंत मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्‍बालसिंग चहल यांनी वर्धा येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील डॉक्‍टरांना बोलावून घेतले आहे. हे 45 डॉक्‍टरांचे पथक 15 दिवस मरोळ येथील सेव्हन हिल्स कोव्हिड रुग्णालयात काम करणार आहे. काही दिवसांपूर्वी खासगी डॉक्‍टरांनाही कोव्हिड रुग्णालयात सेवा देण्याचे आदेश काढण्यात आले होते. 

ही बातमी वाचली का? महाविकास आघाडीतल्या मंत्र्यालाच शिवसेनेकडून हा खोचक सल्ला  

फक्त एक कोरोना रुग्ण आढळलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याचा उल्लेख चहल यांनी केला. गरज भासल्यास मुंबईबाहेरून आणखी डॉक्‍टर येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत दररोज सरासरी 700 नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. चीननेही कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी जगभरातून 42 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले होते. कोरोनाविरोधी उपचारांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयाची क्षमता 500 खाटांवरून 800 खाटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. सध्या तेथे 175 डॉक्‍टर्स असून, आणखी 100 डॉक्‍टरांची गरज होती. वर्धा येथून 45 डॉक्‍टरांचे पथक आल्यामुळे दिलासा मिळाला आहे, असे रुग्णालयाचे प्रभारी डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? चिंताजनक! ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, दिवसभरात इतके रुग्ण...

24 तासांत 800 किमी प्रवास 
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे अतिरिक्त संचालकडॉ. तात्याराव लहाने यांनी डॉक्‍टरांच्या पथकाला आणण्यासाठी मदत केली आहे. वर्धा ते मुंबई या प्रवासासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. हा 800 किलोमीटरचा प्रवास 24 तासांत करून डॉक्‍टरांचे पथक आले आहे. 

मुंबईत 5000 डॉक्‍टरांची गरज 
कोव्हिडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईत किमान 5000 डॉक्‍टर आणि 1000 परिचारिकांची गरज असल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले. ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यातून डॉक्‍टरांचे पथक आणणे सोईस्कर होते. सेवा संपल्यावर त्यांना काही दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येईल, असेही डॉ. लहाने यांनी सांगितले.  

loading image