मोदींच्या भाषणानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणतात...

मोदींच्या भाषणानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणतात...

कोरोनाच्या संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या चार भाषणांमधील मोठं मोठ्या परंतु पोकळ शब्दांतून देशाच्या गरजेचा एक शब्द आज ऐकायला मिळाला तो म्हणजे आर्थिक पॅकेज. गेल्या सहा वर्षातील वेगवेगळ्या पोकळ घोषणांप्रमाणे या आर्थिक पॅकेजची घोषणा भविष्यात पोकळ ठरू नये हीच अपेक्षा. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सकल महसूल उत्पन्नाच्या 10 टक्के म्हणजेच 20 लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये काय अंतर्भूत आहे हे त्यांनी सांगितले नाही. परंतु देशाच्या एकंदर प्रगतीकरता व कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या संकटाला तोंड देण्याकरिता जेवढी आवश्यकता असेल तेवढी रक्कम केंद्र सरकारने देण्याची तयारी ठेवली पाहिजे. 

राज्यांना मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी सातत्याने मागणी केल्याप्रमाणे तसेच काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या मागणीनुसार एकंदर मागणी वाढविण्याकरिता प्रत्येक गरजू नागरिकाच्या खात्यात 7500 रुपये रोख रक्कम सरकारने टाकण्याची आवश्यकता आहे. शेतक-यांचा संपूर्ण माल केंद्र सरकारने हमी भावाने खरेदी केला पाहिजे. या पॅकेजच्या माध्यमातून लघु उद्योजकांना तात्काळ लाभ दिला पाहिजे. 

आत्मनिर्भरता हा शब्द केवळ भाषणापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात उतरवण्याची आवश्यकता आहे. आपदेमधून संधी निर्माण करण्याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की कोरोनाच्या संकटामध्ये एकही PPE आणि N95 मास्क तयार होत नव्हते तिथे आता दररोज दोन लाख PPE आणि N95 मास्क तयार होत आहेत. परंतु हा उद्योग कोरोना संकटानंतर कसा टिकेल याबाबत ते काही बोलले नाहीत. या लॉकडाऊमुळे जे लाखो उद्योग बंद झाले त्यांचे काय? याबाबत पंतप्रधान काही बोलले नाहीत. विश्वाला औषधे पुरविण्याकरिता अनेक देश आपली प्रशंसा करत आहेत आणि समस्त विश्वाला आपला विश्वास वाटत आहे असे म्हणताना मोदीजी देशातील जनतेला औषधे मिळत नाहीत. या संकटकाळात केंद्र सरकार आपल्यासोबत आहे असे जनतेला वाटत नाही याबाबत काही बोलले नाहीत. 

जवळपास अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये केंद्र सरकारच्या उफराट्या कारभारामुळे स्थलांतरित मजुरांची जी वाताहत झाली त्याबद्दल मोदीजींनी कुठलीही संवेदना व्यक्त केली नाही. परंतु याचबरोबर चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करताना 21 दिवसांत कोरोना विरूद्धचे युद्ध जिंकण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले याची कबुली पंतप्रधानांनी आज दिली आहे. 

reaction of balasaheb thorat after speech of PM narendra modi

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com