
मुंबई: केईएम रुग्णालयातील कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना फोन टॅब देण्याचा निर्णय घेण्यात आला असुन त्याद्वारे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाच्या प्रकृतीबाबत माहिती दिली जाणार आहे.
कोरोनाविरोधातील लढाईमध्ये मुंबई महानगर पालिकेकडून अनेक महत्वपूर्ण पावलं उचलली जात आहे. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने आतापर्यंत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयानुसार केईएम रुग्णालयातील डॉक्टरांना टॅबचे वाटप करण्यात आले आहे. जेणेकरून रुग्णांची संपूर्ण माहिती नातेवाईकांना दिली जाईल.
दिवसातून एकदा या टॅबवरुन नातेवाईकांना माहिती दिली जाईल. केईएम रूग्णालयातील 15 वॉर्डस सध्या कोविडसाठी देण्यात आले आहेत. ज्यामुळे याठिकाणी असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात थांबण्याची गरज पडणार नाही आणि रुग्णालयात होणारी अनावश्यक गर्दी टाळता येईल. शिवाय पसरणारा संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल.
प्रत्येक वॉर्डमध्ये 35 रुग्ण:
केईएमचे 15 वॉर्डस कोविड रुग्णांनी भरून गेले आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये 35 रुग्ण दाखल करुन घेतले जातात. जे डॉक्टर्स कोविड रुग्णांवर उपचार करत असतील तेच डॉक्टर्स नातेवाईकांना टॅबवरुन माहिती देतील. तीन शिफ्ट मध्ये हे काम डॉक्टर्स करतील. म्हणजे एका शिफ्टमध्ये डॉक्टरांना फक्त 10 रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करावा लागेल.
"कोविड रुग्णांचे नातेवाईक आधीच फार काळजीत असतात. 15 वॉर्डमध्ये तीन शिफ्टमध्ये काम करणारे डॉक्टर्स टॅबवरून रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती देतील. प्रत्येक वॉर्डमध्ये 35 रुग्ण सध्या दाखल केले जात आहेत. दिवसातून फक्त एकदाच कॉल केला जाईल. रुग्णाची प्रकृती, डिस्चार्ज, शिफ्टींग आणि मृत्यू ही सर्व महत्वाची माहिती त्यांना दिली जाणार आहे. सोमवारपासून ही सुविधा सुरु केली जाणार आहे", अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.
doctors in KEM hospital will get tab for giving information about corona patients to their relative
,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.