esakal | ICU बेडवरुन राडा, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेसवर हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

delhi-hospital

ICU बेडवरुन राडा, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेसवर हल्ला

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांनी आज रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. दिल्लीच्या सरीता विहारमध्ये असणाऱ्या अपोलो रुग्णालयात ही घटना घडली. मृत रुग्णाला आयसीयू बेड मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. आजारी असलेल्या ६२ वर्षीय महिलेला मंगळवारी सकाळी रुग्णालायत आणण्यात आले.

हेही वाचा: मुंबईत पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त अँटीबॉडीज

महिला रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात ICU बेडसाठी प्रतिक्षा करत होती. पण ICU बेड शेवटपर्यंत उपलब्ध होऊ शकला नाही. अखेर तिचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी नर्स, डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हॉस्पिटल बाहेर कुटुंबातील सदस्य डॉक्टरांवर लाठीने हल्ला करताना दिसतात.

हेही वाचा: 'आभासी चित्राचा गाफिलपणा नको', फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

काही संपत्तीचेही नुकसान झाले. रुग्णालय किंवा रुग्णाच्या नातेवाईकांकडून या संदर्भात कोणतीही तक्रार मिळालेली नाही, असे दक्षिण पूर्व दिल्लीचे डीसीपींनी सांगितले. मंगळवारी सकाळी महिलेला रुग्णालयात आणले, त्यावेळी त्यांची अवस्था गंभीर होती असे अपोलो रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

"डॉक्टरांनी लगेच रुग्णावर वैद्यकीय उपचार केले. बेड्स उपलब्ध नसल्याने महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. दुर्देवाने सकाळी आठच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. डॉक्टर, नर्सेसवर हल्ले केले" असे रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

loading image
go to top